हा नागरिकाच्यात जिव्हाळ्याचा विषय आहे. रास्ताभाव दुकानातील धान्य घेण्यासाठी शिधापत्रिकांचा उपयोग नागरिकांना होत असतो. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या नियमावलीनुसार तीन प्रकारच्या शिधापत्रिका देण्यात येतात.
![]() |
बीपीएल गटात मोडणा-या 14 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुंटूबाला देण्यात येते. 1997 च्या यादीत या उत्पन्न गटात ज्यांची नोंद झालेली आहे अशाना बीपीएल आणि अंत्योदय या योजनेचा लाभ देण्यास पात्र समजले जाते. |
![]() |
ही शिधापत्रिका 1 लाखापर्यंत ज्या कुटूंबाचे उत्पन्न आहे अशांसाठी असून त्यांना एपीएल असे संबोधले जाते. |
![]() |
ही शिधापत्रिका अशा कुटूंबाना दिली जाते ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे या शिधापत्रिका धारकाना रास्त भाव दुकानातील अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो. |
![]() |
9 सप्टेंबर 2008 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातल्या विडी कामगार, पारधी व कोल्हाटी समाजाच्या सर्व कुंटूबाना त्यांचे नाव दारिद्रय रेषेखालील यादीत नसले तरी बीपीएलची तात्पुरती सुविधा देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. संबंधित कुटूंबाकडे स्वयंपाकाचा गॅस किंवा दुचाकी वाहन असले तरी हा लाभ त्यांना द्यावयाचा आहे. ते विडी कामगार असल्याची किंवा पारधी, कोल्हाटी समाजातील असल्याची खात्री झाल्यानंतर बीपीएलची पिवळ्या रंगाची शिधापत्रिका तात्पुरते लाभार्थी असा शिक्का मारुन देण्यात येते. |
अशा विविध योजनांच्या माध्यमातून अन्नत, वस्त्र व निवारा या तीन मुलभूत गरजातील अन्ने व त्याच्याशी संबंधीत बाबींचा पुरवठा सर्वसामान्यं जनतेला व्हांवा यासाठी शासनाचा पुरवठा विभाग कार्यरत आहे. ज्या योजना पुरवठा विभागामार्फत शासन राबविते त्याची अंमलबजावणी करणे हे जसे प्रशासनाचे कर्तव्य आहे तसेच या योजनांचा पात्र लाभार्थींना जागरुकपणे व बिनचुकपणे लाभ घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे आणि अधिकारही आहे.